नागपूर ग्रामीण: सिद्धार्थनगर येथे माहेरून पैसे आणण्याकरिता सासरच्या मंडळींनी दिला त्रास,विवाहितेने चक्क डिझेल टाकून जाळून घेतले स्वतःला
समाज किती समोर गेला आणि आज मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्या तरी काही हुंडाबळी पडतच असतात.अशीच एक घटना पोलीस ठाणे कोराडी हद्दीतील महादुला येथून उघडकीस आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरजलाल अंबादे राहणार तुमसर यांची मुलगी पायल हिचे रितीरिवाजाने महादुला येथे राहणारा आकाश शहारे यांच्यासोबत एकोणवीस मे 2019 रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर आरोपी आकाश, तसेच त्याचे प्रकाश शहारे, त्याची आई अलका व त्याचा भाऊ मोंटू यांनी शारीरिक व मानसिक त्रास दिला.