चाकण परिसरात किरकोळ कारणावरून एका २३ वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. काही लोकांनी या तरुणाला थांबवून त्याच्या एका मित्राचा ठावठिकाणा विचारला होता. मात्र, तरुणाने आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगितल्यामुळे आरोपींचा राग अनावर झाला. केवळ माहिती दिली नाही या रागातून ३ जणांनी मिळून या तरुणाला लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने गंभीर मारहाण केली.