कळमेश्वर: दारूमुळे संसार उध्वस्त! 'वार्ड नंबर 12' मध्ये दारूबंदीसाठी महिलांचा 'एल्गार';विक्रेते,तळीरामांच्या शिवीमुळे महिला त्रस्त
दारूच्या विळख्यातून आपल्या कुटुंबांना आणि परिसराला मुक्त करण्यासाठी वार्ड नंबर 12 मधील महिलांनी आज मोठ्या संख्येने एकत्र येऊन 'दारूबंदी'साठी एल्गार पुकारला आहे. दारूमुळे अनेक संसार उध्वस्त झाले असून, दारू पिणारे आणि त्याची अवैध विक्री करणारे खुलेआमपणे अश्लील शिवीगाळ करत असल्याने परिसरातील तरुणी आणि महिलांना असह्य मनस्ताप सहन करावा लागत आहे.वार्ड नंबर 12 मध्ये अवैध दारूविक्री आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.