नांदुरा: ई –पिक पाहणीसाठी सहा दिवसाची मुदतवाढ
ई –पिक पाहणी साठी आता सहा दिवसाची मुदत करण्यात आली आहे. दिनांक 1 ऑगस्ट 2025 ते 14 सप्टेंबर 2025 पर्यंत खरीप हंगाम 2025 करिता इ–पीक पाहणी मोबाईल ॲप द्वारे शेतकरी स्तरावर ई पीक पाहणी नोंदणी उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु राज्यात काही ठिकाणी झालेली अतिवृष्टी दुबार पेरणी इत्यादी .कारणामुळे शेतकरी इ पिक नोंदणी करू शकले नाही. त्या कारणास्तव शेतकरी पीक नोंदणी करण्यापासून वंचित राहू नये म्हणून शेतकरी स्तरावरून पीक नोंदणीसाठी दिनांक 20 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.