कन्नड: कन्नडमध्ये शिवसेनेची निवडणूक तयारी गतीमान — आमदार संजना जाधव यांच्या कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार संजना जाधव यांच्या कन्नड येथील जनसंपर्क कार्यालयात शिवसेनेच्या सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.या मुलाखतींतून स्थानिक पातळीवर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची कामगिरी, जनसंपर्क आणि पक्षनिष्ठेचा सखोल आढावा घेण्यात आला. शिवसेनेचे बळ अधिक मजबूत करून आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचा विजय सुनिश्चित करण्यासाठी ही प्रक्रिया राबवण्यात आली असल्याची माहिती आमदार संजना जाधव यांनी दिली