लोणार: शहरातील तहसील कार्यालय येथे ओबीसी समाज बांधवांच्या वतीने एल्गार मोर्चा
Lonar, Buldhana | Sep 23, 2025 लोणार शहरातील तहसील कार्यालय येथे २३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता ओबीसी समाजाच्या हक्क अधिकार आणि न्यायासाठी विशाल महा एल्गार मोर्चा काढण्यात आला.यावेळी मुख्य मागण्या राजकीय दबावाखाली मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर रद्द करावा.हैदराबाद गॅजेट्स चा अशा पद्धतीने वापर करणे हा ओबीसींवर अन्याय आहे त्यामुळे तो रद्द करावा.यासह इतर मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.यावेळी ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.