जालना येथील संत रामदास मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येथे निकृष्ट भोजनाची तक्रार केल्याच्या कारणावरून 14 वर्षीय विद्यार्थ्याला गरम उलथण्याने मारहाण केल्याचा गंभीर आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. सोमवार दि.19 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या घटनेनंतरही सामाजिक न्याय विभाग अंतर्गत सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.विद्यार्थ्याला मारहाण झाल्यानंतर वसतिगृहाचे गृहपाल सुट्टीवर आहे.