छत्रपती संभाजीनगर : राजेंद्र गोपाळराव पाटील हे आपल्या कुटुंबासह २५ ते २८ ऑक्टोबरदरम्यान बाहेरगावी गेले होते. दरम्यान, त्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश करून कपाटातील रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण तीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.