शेवगाव: शेवगाव शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद. नागरिक भयभीत मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष...
शेवगाव शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद. नागरिक भयभीत मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वाचे नगरपरिषदेकडून उल्लंघन.शेवगाव शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत असून शाळकरी मुले, वयोवृद्ध नागरिक वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. गेल्या काही दिवसांत या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे.