आंबेगाव: मंचरमध्ये बिबट्यासह आता चोरट्यांची दहशत
Ambegaon, Pune | Nov 11, 2025 मंचर शहरातील डोबीमळा परिसरात रविवारी (ता. ९) पहाटे चार चोरटे चोरीच्या उद्देशाने परिसरात फिरत होते. अनेक बंद घरांचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही.त्यामुळे चोरीचे प्रकार टळले. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. बिबट्याच्या वावराप्रमाणे चोरट्यांचाही उपद्रव वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.