रामटेक तालुक्यातील पेंच जलसंपदा विभाग अंतर्गत नगरधन ते नवरगाव दरम्यानचा पेंच डावा कालवा सध्या जीर्ण अवस्थेत असून फुटण्याच्या उंबरठ्यावर आहे. मायनरच्या भिंतीत जागोजागी मोठ्या भेगा पडल्या आहेत. यामुळे पावसाळ्यात तसेच नहर सुरू असताना यावर पाण्याचा दबाव वाढवून कालवा फुटण्याची दाट शक्यता आहे.याकडे लक्ष वेधत गुरुवार दि. 18 डिसेंबरला दु. बारा वाजताच्या दरम्यान जलसंपदा विभागाला याकडे लक्ष देण्याच्या मागणीचे निवेदन पंचायत समिती रामटेकचे माजी सदस्य शंकर होलगिरे सहित शेतकऱ्यांनी दिले आहे.