पवनी: तालुका शालेय खो-खो स्पर्धेत पवनी येथील नव विदर्भ क्रीडा मंडळाचा डंका ; सर्व संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
Pauni, Bhandara | Sep 19, 2025 पवनी तालुका शालेय क्रीडा स्पर्धा अंतर्गत खो-खो सामने गांधी विद्यालय, कोंढा येथे घेण्यात आले. या स्पर्धेत नव विदर्भ क्रीडा मंडळ, पवनीचे खेळाडूंनी वैनगंगा विद्यालय व आनंदम विद्यालय, पवनीचे प्रतिनिधित्व करीत सहभाग घेतला होता. उत्कृष्ट कामगिरी करत १७ वर्षाखालील व १९ वर्षाखालील मुलांच्या गटातील संघांनी (वैनगंगा विद्यालय प्रतिनिधित्व) तसेच १४ वर्षाखालील मुलांच्या गटातील संघाने (आनंदम विद्यालय प्रतिनिधित्व) प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिन्ही विजयी संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे