तालुक्यातील पांजरा गावातील शेत परिसरात एका निम्नवयीन 3 ते 4 महिने वयाच्या सारस पक्षाचा मृत्यू झाल्याची घटना आज नोंदविण्यात आली आहे सदर मृत्यू विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने की विषबाधेमुळे झाला असावा अशी शक्यता असून याबाबत सखोल तपास सुरू आहे धोकाग्रस्त संकटग्रस्त असलेले सारस पक्षी महाराष्ट्रात प्रामुख्याने गोंदिया जिल्हा लगतच्या भंडारा जिल्ह्यात आढळतात विशेष म्हणजे सारस पक्षांची घरटे व नियमित प्रजनन करणाऱ्या जोड्या केवळ गोंदिया जिल्ह्यात आढळतात पावसाळ्यात हे पक्षी धानशेतात घरटी करून अंड