कन्नड: जैतखेडा शिवारात पिशोर पोलिसांची मोठी कारवाई; पंधरा लाखांचा दीड क्विंटल गांजा जप्त, एक जण अटकेत
पिशोर पोलिसांनी गट क्रमांक २१५ मधील शेतात छापा टाकून दीड क्विंटल गांजा जप्त केला आहे. हा गांजा कपाशी व तुरीच्या पिकांमध्ये लपवून ठेवण्यात आला होता. जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे १५ लाख रुपये इतकी आहे.या प्रकरणी काकासाहेब नाना वेताळ (६०, रा. जैतखेडा) याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला हर्मूल कारागृहात पाठवले आहे.सहायक पोलिस निरीक्षक शिवाजीराव नागवे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर बीट जमादार वसंत पाटील यांनी प्राथमिक तपास करून कारवाई केली