दर्यापूर अंजनगाव मार्गावरील सातेगाव बाग परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसापासून वाघ दिसल्याची सुरु असलेली चर्चा आज खरी झाल्याने दुपारी १२ वाजता १० ते १५ शेतकऱ्यांनी बाग परिसरात शेतशिवारात वाघ पाहिल्याचे सांगितले.सदर बाबीबाबत गावचे पोलीस पाटील यांना सांगितले असता पोलीस पाटील यांनी वनविभागाला माहीती देवून बंदोबस्त करण्याची मागणी केली. परिसराची पाहणी केली असता वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले.