धुळे: मंकीपॉक्सचा विळखा घट्ट; धुळ्यातील रुग्णाचा सलग आठवा रिपोर्ट बाधित!
Dhule, Dhule | Nov 11, 2025 धुळेतील हिरे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मंकीपॉक्स रुग्णाचा आठवा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. सौदी अरेबियातून परतलेल्या ४४ वर्षीय व्यक्तीवर महिनाभर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर आहे. मात्र विषाणूचा संसर्ग कायम असल्याने त्यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढणार आहे. पुणे येथील विषाणू विज्ञान संस्थेचे सर्व आठ अहवाल पॉझिटिव्ह आले असून, प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.