अंबरनाथ: बदलापूरमध्ये शिंदेनां मोठा धक्का,भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रुचिता घोरपडे विजयी, कार्यकर्त्यांकडून जल्लोष
गेल्या 25 वर्षांपासून कुळगाव बदलापूर नगर परिषदेवर शिवसेनेचे वर्चस्व होते, मात्र यंदा चित्र बदलले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा नगराध्यक्ष असलेल्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेवर यंदा भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रुचिता घोरपडे या 7433 मतांनी विजयी झाल्या आहेत. शहराचा विकास करणारा सुसंस्कृत चेहरा त्यांना हवा होता आणि त्यांनी त्यामुळे मला निवडले असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित विजयी उमेदवार रुचिता घोरपडे यांनी दिली आहे.विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष ke