छत्रपती संभाजीनगर : पार्ट टाइम जॉबची आकर्षक ऑफर देत सायबर भामट्यांनी एका तरुणीची तब्बल २६ लाख ७३ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार २४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत घडला असून, याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात चार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.