तेल्हारा: प्रकाश आंबेडकर यांची भाजप-आरएसएसवर टीक तर राहुल गांधी यांना ही केला सवाल; प्रकाश आंबेडकर
Telhara, Akola | Nov 27, 2025 वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि आरएसएसवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. येणाऱ्या काळात देशात संविधान मानणारे विरुद्ध संविधान न मानणारे असे मोठे विभाजन दिसून येईल, असे भाकीत त्यांनी मांडले.आरएसएस हे कोणत्याही ठिकाणी नोंदणीकृत (रजिस्टर) संघटनाच नसून, देशातील सर्वच राजकीय पक्षांनी हा प्रश्न उघडपणे विचारायला हवा. ओबीसी संघटनांनी जर नोंदणी केली नसती तर त्यांना जिल्ह्यात टाकले असते.