जळकोट: ४० तासांच्या शोधा नंतर सापडले तालुक्यातील वाहून गेलेल्या तिघांचे मृतदेह..
Jalkot, Latur | Sep 20, 2025 जळकोट तालुक्यात अतिवृष्टीचे 3 बळी जळकोट तालुक्यातील वारंवार झालेल्या अतिवृष्टीने पुन्हा एकदा हाहाकार माजवत तीन निष्पाप जीवांचे प्राण घेतले. तीन दिवसांपासून बेपत्ता असलेले तिरुका येथील सुदर्शन माधव घोणशेट्टे (२७), नरसिंगवाडीचे वैभव पुंडलिक गायकवाड (२४) आणि सीआयएसएफ जवान शान मुरहरी सूर्यवंशी (३२) यांचे मृतदेह अखेर शुक्रवारी (दि.१९) शोध पथकांना मिळाले. दि. १६ सप्टेंबर रोजी तिरुका येथील सुदर्शन घोणशेट्टे हे शेताकडे