जालना रोड परिसरात गावठी पिस्तूलसह, दोन आरोपींना गुन्हे शाखा पोलिसांनी केली अटक
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Jan 20, 2026
आज मंगळवार 20 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयातून माहिती देण्यात आली की 19 जानेवारी रोजी रात्री आठ वाजता जालना रोड परिसरातून आरोपी बाबासाहेब रामराव मिसाळ वय तीस वर्षे राहणार जानेफळ दाभाडी तालुका भोकरदन जिल्हा जालना, दुसरा आरोपी राईस खान अजीम खान पठाण राहणार पुंडलिक नगर छत्रपती संभाजीनगर यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून दोन गावठी कट्टे तीन जिवंत बंदुकीच्या गोळ्या जप्त करण्यात आले आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.