छत्रपती संभाजीनगर : मानवी हस्तक्षेपाचा फटका शेतशिवारात सापडलेल्या २२ दिवसांच्या बिबट्यांच्या दोन पिलांना बसला. जगण्यासाठी आधार असलेली त्यांची आईच त्यांच्यापासून दुरावली. वन विभागाने प्रयत्न करूनही बिबट्याच्या मादीने त्या पिल्लांचा स्वीकार न केल्यामुळे त्यांची रवानगी नागपूरला करण्यात आली.