आज दि.११ डिसेंबर २०२५ गुरुवार रोजी प्राप्त माहीती नुसार मंगरूळपीर तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसांत थंडीचा जोर लक्षणीय वाढला असून सकाळी व सायंकाळी गारठा चांगलाच जाणवत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात अचानक घट झाली आहे. विशेषतः पहाटेच्या वेळेस धुक्याचे प्रमाण वाढल्याने दृष्यमानता कमी होत असून ग्रामीण भागात वाहतूकही मंदावलेली दिसत आहे.शहरातील अनेक भागांत सकाळी ९ वाजेपर्यंतही गारठा कायम राहत असल्याने नागरिकांनी उबदार कपड्यांचा व गरम पेयांचा आधार घेतला आहे.