उदगीर: उदगीर तालुक्यात ठीक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस,उकाड्यापासून नागरिकांना मिळाला दिलासा
Udgir, Latur | May 13, 2025 उदगीर तालुक्यातील शिरोळ, जाणापूर,कौळखेड, मल्लापूर,चांदेगावं,नागलगाव,परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला,दुपारी तीन वाजल्यापासून वातावरणात बदल झाला होता त्यामुळे तापमानात वाढ झाली होती,१३ मे रोजी सांयकाळी पाच वाजेच्या दरम्यान उदगीर तालुक्यात ठीक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला, या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.