बार्शी: पूरग्रस्तांसाठी मायेची साडी : वैरागच्या महिलांनी दाखवली मानवतेची ताकद
Barshi, Solapur | Sep 30, 2025 अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वैराग पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुंदन गावडे यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. संतनाथ नगरच्या महिलांनी ३० रोजी रात्री ८च्या सुमारास एकजुटीचे दर्शन घडवत एका दिवसातच 40 साड्या जमा करून त्या पूरग्रस्तांसाठी सुपूर्द केल्या. या साड्या केवळ मदत नसून मायेची ऊब व दु:खात दिलासा देणारे प्रतीक असल्याचे महिलांनी सांगितले. महिलांच्या या उपक्रमाने माणुसकीचे अनोखे उदाहरण घालून दिले आहे.