खेड: मुंबई-गोवा महामार्गावर समाधान धाबा येथे लेन क्रॉस करीत असताना अज्ञात वाहनाची धडक बसल्याने तरुणाचा मृत्यू
Khed, Ratnagiri | Apr 15, 2024 मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील समाधान धाबा येथे लेन क्रॉस करीत असताना अज्ञात वाहनाची धडक बसल्याने चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथील आदित्य संतोष गमरे या १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. १३ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता हा अपघात घडला.