आमगाव: सात हजारांची देशी-विदेशी दारू जप्त, बघोली येथील घटना
Amgaon, Gondia | Oct 30, 2025 ग्राम बघोली येथील दिलीप मनिराम अंबुले (५७) याच्या जवळून सोमवारी (दि. २७) सायंकाळी ६:२० वाजता मोहफुलाची १० लिटर दारू, देशी दारूचे ४७ पव्वे व पाच नग बिअर, असा एकूण सहा हजार ९०० रुपयांचा माल पोलिसांनी धाड टाकून जप्त केला. ही कारवाई हवालदार मिल्कीराम पटले यांनी केली आहे. तक्रारीवरून आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई), ७७ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.