साकोली: सावरबंध तीर्थक्षेत्र येथील बिरसा मुंडा चौकात ढाल पूजा व गायगोधन मोठ्या उत्साहात साजरा
साकोली तालुक्यातील सावरबंध येथील बिरसा मुंडा चौकात आदिवासी समाज बांधवांनी ढालपूजा व गाईगोधन मोठ्या उत्साहात बुधवार दि22ऑक्टोबरला सायंकाळी 6वाजता दिवाळीच्या पाडव्याला उत्साहात साजऱी केली.अनेक वर्षाच्या परंपरा असलेला हा सण आदिवासी समाजाने संपूर्ण गावातील गाईंना एकत्र करून गोधनावर त्यांचे पूजन करून त्या गाईंना खेळवण्यात आले.ढालीचे पूजन सरपंच माधवी बडवाईक,उपसरपंच डॉ अनिल शेंडे यांच्या हस्ते करण्यात आले.भागवत बडवाईक देवचंद चांदेवार निलेश बडवाईक संदीप रामटेके उषा मेश्राम यांची उपस्थिती होती