करवीर: रामोशीबेरड समाजासह भटक्या विमुक्त समुदायांना आदिवासी दर्जा द्या-करवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळ अध्यक्ष वसंतराव चव्हाण
कर्नाटक, आंध्र प्रदेश,तेलंगणा राज्यामध्ये बेरड वडार रामोशी या भटक्या विमुक्त समुदायांना आदिवासी दर्जा आहे. असाच दर्जा महाराष्ट्रात मिळावा अशी मागणी करवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्या शिष्टमंडळ कोल्हापूरच्या जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान या अशा असे निवेदन राष्ट्रपती, प्रधान मंत्री, मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आल्याचं सांगितलं आहे.