पनवेल: देशी दारू व व्हिस्किच्या बाटल्या विनापरवाना विक्रीकेल्याप्रकरणी एकास करंजाडे येथून पनवेल शहर पोलिसांनी केली अटक
Panvel, Raigad | Apr 12, 2024 देशी दारू, व्हिस्कीच्या बाटल्या विनापरवाना विक्री केल्याप्रकरणी शालिक लक्ष्मण गावंड याच्या विरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याला अटक केली. आर वन, करंजाडे येथे एक व्यक्ती विनापरवाना दारू विक्री करत असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बनवत गिऱ्हाईक पाठवून खातरजमा करत त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी शालिक गावंड याच्याकडे हजारो रुपये किमतीची देशी दारू आणि व्हिस्की आढळून आली.