मुर्तीजापूर: आमदार हरीष पिंपळे यांनी उमरी अरब नजिक पुलाजवळ झालेल्या गरजू अपघात ग्रस्त व्यक्तीला तात्काळ दिली वैद्यकीय मदत
आमदार हरीष पिंपळे हे नेहमीच गरजवंत रुग्णांना पीडित नागरिकांना मदत करतात.आरोग्य सेवा पुरवण्याचे प्रयत्न करतात.ज्यांचा कोणी वाली नाही अशांना नेहमी मदत करतात.त्यांनी संत गजानन महाराज बहुउद्देशीय संस्था आपत्कालीन पथकाची स्थापना सुद्धा केलेली आहे. या संस्थेचे मार्फत त्यांनी अनेक समाज उपयोगी कामे केली आहेत.अशीच एक घटना सोमवार ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता च्या दरम्यान उमरी अरब जवळील नदीच्या पुलाजवळ दुचाकीचीअपघात झाला असता अपघातग्रस्तांना उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी आपल्या वाहनातून आणले