उमरेड: अल्पवयीन बालिकेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या चार आरोपींना आजीवन कारावास
Umred, Nagpur | Nov 6, 2025 पोलीस ठाणे उमरेड हद्दीत दिनांक 19 जुलै 2022 रोजी अल्पवयीन पीडीतअल्पवयीन पीडीता ही आपल्या घरी असताना आरोपी रोशन कारगावकर वय 29 वर्ष आणि आरोपी गजानन मुरुसकर वय 40 वर्षे यांनी तिला घरी जाऊन एक काम आहे अशी थाप मारून स्वतःच्या घरी बोलावले आणि आधी स्वतः तिचे लचके तोडले आणि नंतर दोन मित्रांना बोलावून त्यांनी देखील तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी आरोपींना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.