कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील गोंडखैरी टी पॉइंट वरील ऍटमॉस्फियर हॉटेलमध्ये अवैधरित्या हुक्का सेवन करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली हॉटेल सारखा सह पाच जनाविरुद्ध गुन्हा नोंदवला असून हुक्का साहित्य जप्त करण्यात आले. सावनेर विभागाची उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने रविवारी पेट्रोलिंग दरम्यान ही कारवाई केली घटनास्थळी यश सुशील जैन पारस संजय जैन संकेत सोमेश्वर काळे साहिल राजेश सनकत यांना हुक्का सेवन करताना पकडले