औसा: औशात राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव, महाराष्ट्र संस्कृतीचा अनोखा सोहळा! ३ ते ५ नोव्हेंबर दरम्यान नाथ मंगलकार्यालयासफर कीर्तन
Ausa, Latur | Nov 3, 2025 औसा - महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणाऱ्या कीर्तन या माध्यमातून संत विचार, अध्यात्म आणि समाजजागृतीचा संदेश देण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने औशात राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.हा भव्य कीर्तन महोत्सव ३ ते ५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत औसा येथील नाथ मंगल कार्यालयात पार पडणार असून, प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य ठेवण्यात आला आहे. या कीर्तन महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार अभिमन्यू पवार यांनी केले आहे.