लोकनेते पोस्टरवर नव्हे, तर लोकांच्या हृदयात असतात आणि त्या हृदयांवर सत्तेची मस्ती चालत नाही, अशा शब्दांत मराठा क्रांती मोर्चाने भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. मंगळवार दि. 6 जानेवारी 2025 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार लातूर येथे झालेल्या वक्तव्यामुळे भाजपचा असभ्य, असंस्कृत आणि विखारी चेहरा उघड झाला असून ही टीका नसून सत्तेची गुर्मी असल्याचा आरोप मराठा महासंघ तथा मराठा क्रांती मोर्चाचे अरविंद देशमुख यांनी केला.