दारव्हा शहरातील कारंजा मार्गावरील जिल्हा परिषद उर्दू हायस्कूल समोर पालिकेने लावलेले पथदिवे गत सहा महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. यामुळे पादचाऱ्यांना रात्रीदरम्यान अंधाराचा सामना करावा लागत आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असून त्वरित पथदिवे सुरू करण्याची मागणी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आज दिनांक 8 डिसेंबरला दुपारी एक वाजता दरम्यान निवेदनातून करण्यात आली आहे.