देसाईगंज वडसा: देसाईगंज नगरपरिषदेची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर
मागील चार ते पाच वर्षांपासून नगरपरिषदेच्या रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बार फुटणार आहे. सोमवार ६ ऑक्टोंबर रोजी राज्यातील २४७ नगरपालिका व १४७ नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली होती.त्यानुसार देसाईगंज नगराध्यक्षपदी ओबीसी महिला यांची वर्णी लागणार आहे.तर आज,बुधवार ८ ऑक्टोंबर रोजी दूपारी ११ वाजता देसाईगंज नगरपरिषदेच्या १० प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.