शहादा: ॲड. गोवाल पाडवींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नंदुरबार संजय टाऊन हॉल येथून निदणार रॅली, उपस्थितीचे आमदार नाईक यांचे आवाहन
महाविकास आघाडीचे उमेदवार अॅड. गोवाल पाडवी यांचा उमेदवारी अर्ज दि. २५ एप्रिल रोजी दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचा नामांकन दाखल करण्यासाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील राष्ट्रवादी न कॉग्रेस पक्षाचे शरद पवार व गट, उध्दव बाळासाहेब ठाकरे - शिवसेना गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध संघटनातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने नंदुरबार शहरातील संजय टाऊन हॉल येथे सकाळी १० वाजता .उपस्थित रहावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष तथा आ. शिरीषकुमार नाईक यांनी केले आहे.