भंडारा: नगर परिषद मतमोजणी आता २१ डिसेंबरपर्यंत तहकूब! स्थगित झालेल्या २ प्रभागांसाठी २० डिसेंबर रोजी पुन्हा मतदान
भंडारा नगर परिषदेच्या निवडणुकीतील मतमोजणी आता २१ डिसेंबर २०२५ पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. ३० नोव्हेंबर २०२५ रोजी निवडणूक आयोगाने प्रभाग क्र. १२ (अ) आणि १५ (अ) मधील मतदान थांबवले होते, मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी ही माहिती उमेदवारांना दिली नाही. त्यामुळे, ठरल्याप्रमाणे २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होण्यावर अनिश्चितता निर्माण झाली. प्रभाग १२ (अ) च्या उमेदवार अश्विनी बुरडे यांनी त्वरित उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात (रिट पिटीशन क्र. ७५१२/२०२५) धाव घेतली.