देवणी: जवळगा येथील चार दुकानांना शॉर्टसर्किटमुळे आग.. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिली घटनास्थळी भेट
Deoni, Latur | Oct 26, 2025 जवळगा ता. देवणी येथील चार व्यापारी संगप्पा माधव कुंभार, सूर्यकांत रोहिदास सूर्यवंशी, बापूराव ज्ञानोबा बोडके, कृष्णा पाटोळे यांची दुकाने शॉर्ट सर्किटमुळे आगीत पूर्णपणे जळून खाक झाली. घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने फोन करुन माहिती दिली व पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या व नंतरची प्रोसिजर ही व्यापाऱ्यांना न्याय मिळावा या भावनेने करावी असे संबोधित केले. व्यापारी बांधवांना धीर देऊन प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.