आज १८ डिसेंबर गुरुवार रोजी दुपारी साडे तीन वाजता अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे आयोजन अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले होते. या मुलाखती प्रक्रियेमध्ये उमेदवारांची संघटनात्मक कामगिरी, सामाजिक योगदान व निवडणुकीसाठीची तयारी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.या प्रसंगी खासदार मा. बळवंतभाऊ वानखडे, माजी पालकमंत्री यशोमती ताई ठाकुर, माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी महापौर विलास इंगोले, माजी महापौर मिलिंद चिमोट