जागतिक वारसा दर्जा लाभलेल्या वेरूळ लेणी परिसरातील पर्यटन मार्गावरून सुरू असलेल्या उसाच्या डबल ट्रॉली ट्रॅक्टर वाहतुकीमुळे नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वेरूळ घाटातील अरुंद व वळणावळणाच्या रस्त्यावरून ही वाहतूक सुरू असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः सकाळी व संध्याकाळी पर्यटकांची वर्दळ असताना ट्रॅक्टरची ये-जा अधिक धोकादायक ठरत आहे.