माण: माण तालुक्यात कुळकजाई शेडगेवाडी रस्त्यावर निर्घृण खून; मृतदेह झुडपात टाकल्याने खळबळ, दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Man, Satara | Nov 5, 2025 माण तालुक्यातील कुळकजाई – शेडगेवाडी रस्त्यावर मंगळवारी मध्यरात्री एका इसमाचा निर्घृण खून करून त्याचा मृतदेह झुडपात टाकण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दहिवडी पोलीस ठाण्यातून बुधवारी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार, कुळकजाई गावापासून शेडगेवाडी रस्त्याकडे जाणाऱ्या महारकी शिवारात दुपारच्या सुमारास काही गावकऱ्यांना झुडपात एका इसमाचा मृतदेह आढळला.