'ऑपरेशन थंडर' मोहिमेअंतर्गत अमली पदार्थ विरोधी कारवाई करत नागपूरच्या मानकापूर पोलिसांनी मोठी यशस्वी कामगिरी केली आहे. मानकापूर हद्दीतील फरस चौक परिसरात एका संशयास्पद कारची झडती घेतली असता, डिक्कीमध्ये लपवून ठेवलेला तब्बल २१ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी ओडिशामधील बलगाम धाना बुरडी, प्रदीपकुमार दास, सुरेंद्र पुजारी आणि जतीन खिल्लारे या चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.