राहाता: शिर्डीत धुवाधार पाऊस. नगरपरिषदेने नाळेसफाई न केल्याने अनेक भागात साचले पाणी..
तासाभराच्या धुवांधार पावसानं साईनगरी शिर्डीत सर्वत्र पाणीचं पाणी.. मुख्य रस्त्यासह शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले.साईबाबांच्या शिर्डीला परतीच्या पावसानं चांगलच झोडपलय.. संध्याकाळी सुरु झालेल्या पावसान तासाभरात सर्वत्र पाणीच पाणी केलय.. शिर्डीतून जाणा-या नगर-मनमाड हा मुख्य रस्ता देखिल काही ठिकाणी पाण्याखाली गेल्यानं दिसून आलय.यंदाच्या पावसळ्यातील सर्वात मोठा आणि धुव्वादार पाऊस म्हणून याकडे पाहीले जातय शिर्डीच्या अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलयं.