नाशिकमधील अंबड पोलीस ठाण्यात २ कोटींपेक्षा अधिक रकमेच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओ. व्ही. लिकर्स या फर्मच्या भागीदारीतून बाहेर पडताना आरोपी रोहित वालेचा याने भागीदार प्रितम चौधरी यांना न सांगता साउथ सिज ब्रेव्हरीजकडे जमा असलेले २ कोटी रुपये परस्पर काढून घेतल्याचा आरोप आहे. तसेच व्यवसायातील उर्वरित रक्कम परत न देता एकूण २ कोटी ३४ हजार २४७ रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.