दहिगाव या गावातील शेतकरी पांडुरंग पाटील यांच्या दहिगाव शेत शिवारात शेत गट क्रमांक २६२ मध्ये त्यांनी गहू पिकाची लागवड केली आहे. दरम्यान या गहू पिकामध्ये कोणीतरी अज्ञाताने ट्रॅक्टर आणि बैलगाडी फिरवून त्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शेतकरी पांडुरंग पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दिली आहे.