अमळनेर: रामेश्वर कॉलनीत तरूणावर धारदार शस्त्राने वार करणाऱ्या चौघांना अटक; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल
जुन्या वादातून हर्षल उर्फ बब्या कुणाल पाटील (वय १८, रा. एकनाथ नगर, रामेश्वर कॉलनी) या तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याची घटना रविवारी १४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता रामेश्वर कॉलनीतील राज शाळेजवळ घडली होती. याप्रकरणी सोमवारी १५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजता चार जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आले आहे. यामध्ये तीन जण रेकॉर्डवरील गुन्हेगार असून एकावर तर या पूर्वी ‘एमपीडीए’चीदेखील कारवाई झालेली आहे.