जामखेड: स्वीकृत नगरसेवक दत्तात्रेय वारे, व माजी सदस्य प्रसाद ढोकरीकर भाजपमध्ये दाखल...!
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे स्वीकृत नगरसेवक प्रसाद ढोकरीकर व अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रेय वारे यांनी पक्षाला रामराम करीत बुधवारी (ता. १२) सकाळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या उपस्थितीत आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मुंबईत भाजपत प्रवेश केला. प्रसाद ढोकरीकर कर्जत राष्ट्रीय सेवा संघाचे महत्वाचे पदाधिकारी यासह कर्जत नगरपंचायतीमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून कार्यरत आहे.