जळकोट: बेळसांगवी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला शासनाने तात्काळ मदत देऊन आधार द्यावा... आमदार अमित देशमुख
Jalkot, Latur | Oct 4, 2025 अतिवृष्टीच्या काळात आलेल्या महापुरात पिकांसह जमीन खरडून गेल्यामुळे चिंताग्रस्त बनलेले जळकोट तालुक्यातील बेळसांगवी येथील शेतकरी मारोती संग्राम रायकवाडे यांनी आत्महत्या केल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि मनाला चटका लावणारी आहे. या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना तातडीने मदत देऊन आधार द्यावा अशी मागणी राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शासनाकडे मागणी करीत आहे.